जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेळेपाडा केंद्र संगम तालुका मुरबाड जिल्हा ठाणे सहर्ष स्वागत करीत आहे.

Saturday, August 08, 2020

MAHATET - 2019 EXAM RESULT

 MAHATET - 2019 (महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९) परीक्षेचा अंतरिम निकाल उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.


https://mahatet.in/

👆🏻See Result TET exam 2019


१)ज्या उत्तरसूचीवरून निकाल निश्चित केला आहे. ती उत्तरसूची परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

२) प्रत्येक उत्तरसूचीमधील "#" या चिन्हाचा अर्थ रद्द झालेले असा आहे.

३) निकालानंतर प्रश्न व उत्तर यांच्या कोणत्याही आक्षेपांबाबत विचार करण्यात येणार नाही.

४) शासन निर्णय दिनांक १३ फेब्रुवारी २०१३ व २३ ऑगस्ट २०१३ मधील निकषानुसार खुल्या प्रवर्गासाठी किमान ६०% गुण आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी व दिव्यांगांसाठी किमान ५५% गुण उत्तीर्णतेसाठी आवश्यक आहेत.

५) रद्द झालेले प्रश्न कमी करून उर्वरित अचूक प्रश्नानुसार मिळालेल्या गुणांची टक्केवारी अचूक प्रश्नांच्या गुणांवर काढण्यात आली आहे. टक्केवारी काढण्यासाठी खालीलप्रमाणे सूत्र वापरण्यात आलेले आहे.

                                                                                                                अचूक प्रश्नांचे मिळालेले गुण * १००

प्राप्त गुणांची टक्केवारी = ----------------------------------. 

                                     एकूण अचूक प्रश्नांचे गुण

६) * * उपरोक्त सूत्रानुसार मिळालेल्या टक्केवारीनुसार खुल्या प्रवर्गासाठी ५९.५०% व त्यापेक्षा जास्त तर मागासवर्गीय आणि दिव्यांग प्रवर्गासाठी ५४.५०% व त्यापेक्षा जास्त टक्के गुण असल्यासच पात्र समजण्यात आले आहे.

७) ऑनलाइन अर्जामध्ये नमूद माहिती आरक्षण, ऐच्छिक विषय , दिव्यांगत्व इ. नुसार पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार लाभ मिळाला नसल्यास उमेदवारांचे login मधील Mark Verification या Tab द्वारे योग्य त्या पुराव्यासह दि. १५/०८/२०२० पर्यंत online अर्ज करता येईल.

८) पात्र परीक्षार्थीना पात्रतेचे प्रमाणपत्र संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/शिक्षण निरीक्षक मुंबई (उ.द.प) यांचेमार्फत समक्ष दिले जाईल. शैक्षणिक, व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास त्याबाबतचे मूळ प्रमाणपत्र त्यावेळी सादर करावे लागेल. त्याबाबतचा तपशील निकालावरील आक्षेपांची पूर्तता झाल्यानंतर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.

1 comment: